Operation sindoor: PAF ने भारताला धक्का दिला? सत्य समोर आलं की पाकिस्तानचा खोटेपणा उघड

पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वाने अलीकडेच केलेले दावे आणि वक्तव्ये केवळ भारताशी असलेल्या तणावपूर्ण संबंधांवर प्रकाश टाकतातच, पण त्यात दाखवलेली फसवणूक आणि आत्मप्रशंसा यावरही गंभीर प्रश्न उपस्थित करतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानी हवाई दलाच्या (PAF) शौर्याबद्दल केलेले खोटे दावे. विशेषतः भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानची घालमेल वाढली असून, देशांतर्गत असंतोष आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी टीका थोपवण्यासाठी पाकिस्तान सरकार सतत स्वतःच्या लष्कराच्या कर्तृत्वाचे बडेजाव करत आहे. मात्र, यावेळी खुद्द पाकिस्तानी वृत्तपत्रांनीच शाहबाज शरीफ यांचा खोटेपणा उघड केला आहे, ही बाब अत्यंत महत्त्वाची आणि लाजीरवाणी आहे. पाकिस्तानचा खोटा पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी संसदेत आणि प्रसारमाध्यमांमध्ये दावा केला की PAF ने भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर प्रत्युत्तर देऊन मोठा विजय मिळवला. शाहबाज शरीफ यांनी संसदेत आणि जनतेसमोर केलेल्या वक्तव्यात PAF ने भारताच्या ऑपरेशनला धडक दिली आणि मोठा विजय मिळवला असा दावा केला होता. मात्र, याचे कोणतेही ...